पीओपीवरील बंदी मागे घ्या : निंबाळकर यांची मागणी

मूर्तिकार व कामगारांचा गुरुवारी राज्यव्यापी मेळावा

। अहमदनगर  ।  दि10  फेब्रुवारी ।   प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून देवीदेवतेंच्या मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्याच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डच्या निर्णयाविरोधात जिल्हा मूर्तीकार संघटना व श्री गणेश मूर्तिकार प्रतिष्ठाण (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत निंबाळकर यांनी दिली आहे.



माजी मंत्री आमदार आशिष शेलार, प्रांत सचिव प्रवीण बावधनकर, प्रदेशाध्यक्ष अभय म्हात्रे, शास्त्रज्ञ डॉ.जयंत गाडगीळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा गुरुवारी (दि.11) सकाळी 10 वाजता नगर -कल्याण रोडवर, नालेगाव येथील सुखकर्ता लॉन येथे होणार आहे.


निंबाळक यांनी म्हंटले आहे की, जीपस्म नावाचे तुकडे भाजून नंतर गिरणीत दळून तयार केल्या जाणार्‍या पावडरला पीओपी म्हणतात. यात कुठेही रसायनचा वापर होत नाही. पर्यावरण कायद्याच्या नियमावलीत घातक पदार्थ म्हणून पीओपीचा समावेश आहे.



परदेशातील पीओपीच्या मटेरियल जाटा शिटमध्ये पीओपी हा जलजीवनास घातक असल्याचा उल्लेख नाही. कोणत्याही प्रयोगशाळेत घातक असल्याचे सिध्द झालेले नाही. जिल्हयातील मूर्मिकारांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन भरत निंबाळकर, उपाध्यक्ष सुशील देशमुख, सचिव संतोष रायपेल्ली यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहेें

Post a Comment

Previous Post Next Post