। अहमदनगर । दि.10 फेब्रुवारी। मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन बांधकामासाठी तसेच सौरऊर्जा प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
पवार यांच्या उपस्थितीत आज नाशिक येथे विभागीय जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीवेळी आमदार जगताप यांनी देशपांडे रुग्णालय व सौरऊर्जा प्रकल्पासाठी निधी देण्याच्या मागणीचे निवेदन पवार यांना दिले.
दोन मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प तसेच बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी आ.जगताप यांनी पवार यांच्याकडे केली. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
बाळासाहेब देशपांडे रुग्णालय जिल्हयाभरातून रुग्ण येतात. या रुग्णालयामार्फत शासनच्या सर्व योजना राबविल्या जातात. सदरची इमारत ही जुनी असून याठिकाणी रुग्णांना अद्यावत सुविधा देण्याचे अडचणीचे ठरत आहेत.
यामुळे देशपांडे रुग्णालयाची इमारत अद्यायावत बांधण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे. जिल्हया नियोजन मंडळाच्या सन 2020-21 या अर्थसंकल्पातून खास बाब म्हणून 16 कोटी रुपये तरतुद करण्यात यावी.
तसेच पाणीपुवरठ्यासाठी दोन मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारणे गरजचे आहे. जिल्हया नियोजन मंडळाच्या सन 2020-21 या अर्थसंकल्पामध्ये सदर उर्जा प्रकल्प उभारणीसाठी विशेष तरतुद करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली.
