खेळते भांडवल योजना : जिल्हा बँकेचे 286 कोटींचे कर्जवाटप

। अहमदनगर । दि.03 जानेवारी । जिल्ह्यातील शेतकर्‍यांना बँकेने खेळते भांडवल स्वरूपात मोठया प्रमाणावर कर्ज वाटप केले असुन 44654 शेतकर्‍यांना 286 कोटीचे कर्जवाटप केले असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, उपाध्यक्ष रामदास वाघ व ज्येष्ट संचालक शिवाजी कर्डीले यांनी दिली.

नाबार्डने कळविले नुसार सन 2020-21 सालाकरीता खेळते भांडवल कर्ज योजनेची कालावधी 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षासाठीच लागू असुन शेतकर्‍यांनी सदर कर्जाची परतफेड ही 31 मार्च 2021 पर्यंत करावयाची असुन या योजनेचा व्याजदर कर्जदार सभासदास 7 टक्के दराने पडणार आहे. 

खेळते भांडवल व पिक कर्जासहीत 3 लाखापर्यंतच्या कर्जास व्याज अनुदान शेतकर्‍यांना मिळणार असुन सदरहू कर्ज वेळेत भरल्यास हे 3 टक्के व्याज अनुदान प्राप्त होवु शकते. नाबार्डने चालु केलेली ही नविन योजना  राबविताना जिल्हयात मोठया प्रमाणात कर्जमाफी आल्याने तसेच जिल्हा बँकेच्या पिक कर्जासाठी जिल्हयात सेवा संस्था पातळीवर मोठया प्रमाणात कामकाज चालु होते. 

जिल्हयात कराना संसर्गजन्यरोगाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने या नविन सुरू झालेल्या खेळत्या भांडवली योजनेस संस्था पातळीयर विलंब झाला. खेळते भांडवली कर्ज योजना ही कॅश क्रेडीटचा प्रकार असल्याने त्याची परतफेडीची मुदत ही 31 मार्च असते. चालु वर्षात योजना उशिरा सुरू झाल्याने शेतकर्‍यांना कमी कालावधीमध्ये कर्ज परतफेड करावी लागत आहे.  परंतु ही अडचण चालु वर्षापुरतीच असुन पुढील वर्षी खेळते भांडवल योजना नियमीतपणे होईल.

Post a Comment

Previous Post Next Post