तृप्ती देसाई सुपा पोलिसांच्या ताब्यात!

। शिर्डीला जाण्याच्या मुद्द्यावर ठाम  

। साई संस्थानात जाऊन बोर्ड काढणारच!


नगर, (दि.10 डिसेंबर) : भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांना शिर्डीत प्रवेशबंदी घातली असली तरी तो आदेश धुडकावून शिर्डीत येण्याची तयार करणार्‍या तृप्ती देसाई यांना सुपा टोलनाक्याजवळ पोलिसांनी अडविले.


तृप्ती देसाई व भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सुपे टोलनाक्याजवळ रोखले असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.


तृप्ती देसाई यांना सुपे पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. सुपा पोलिस स्टेशनचे प्रवेशद्वार पोलिसांनी केले बंद करत माध्यमांना पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास रोखले आहे. नगरच्या वेशीवर आम्हाला रोखणं पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत आहोत.


साई संस्थानावर कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतले पाहिजे. आम्हाला कितीही थांबवलं तरी आम्ही शिर्डीला जाणारच,’ अशी ठाम भूमिका तृप्ती देसाई यांनी घेतली. आमच्या महिला कार्यकर्त्या साई संस्थानात जाऊन बोर्ड काढायला तयार आहेत, असेही त्या म्हणाल्या आहेत.


दरम्यान, शिर्डीच्या दिशेने तृप्ती देसाई निघाल्यानंतर शिवसेना महिला आघाडीसह ब्राम्हण महासंघाच्या महिला कार्यकर्त्या, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक हे शिर्डीत ठाण मांडून आहेत. देसाई यांनी फलक हटवण्याचा इशारा दिल्याने देसाई यांच्या विरोधात स्थानिक महिला आक्रमक झाल्या आहेत.


त्यांनी शिर्डीत यावं, बोर्डाला हात लावावा, आम्ही तृप्ती देसाई यांच्या तोंडाला काळ फासणार असे थेट आव्हान शिवसेनेच्या स्वाती परदेशी यांनी दिले आहे. दुसरीकडे ब्राम्हण महासंघाच्या महिला कार्यकर्त्यांनी तृप्ती देसाई यांना आता शिर्डीत येण्याची परवानगी द्यावी, आम्ही फलकाचे रक्षण करण्यास समर्थ आहोत, त्यांच्या स्टंटला स्टंटनेच उत्तर देणार, असा इशारा दिला आहे.

.

Post a Comment

Previous Post Next Post