भिंगारमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा


नगर, (दि.02 ऑक्टोबर) :  शहराच्या लगत भिंगार परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकून जुगार्‍यांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, भिंगारच्या सावतानगरमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून येथील 19 जुगार्‍यांना ताब्यात घेतले आहे.

जुगार्‍यांकडून रोख रक्कम, मोटारसायकल असा सुमारे दोन लाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांना सावतानगरमध्ये जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

पीएसआय पंकज शिंदे यांच्या पथकाला त्यांनी छापा टाकण्याचे आदेश दिले. सावतानगरमधील घराच्या अडोशाला सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळताना पोलिसांना काहीजण दिसले.  पोलिसांचा सुगावा लागताच काहींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र, तो प्रयत्न अयशस्वी  झाला.

जुगारीच्या छाप्यात रोकड, पत्ते असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त करत 19 जुगार्‍यांना ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post