महात्मा फुले जयंती मिरवणुकीत डी जे दणाणला : गुन्हा दाखल

। अहमदनगर । दि.14 एप्रिल 2024 ।  महात्मा फुले जयंती मिरवणूक दरम्यान ध्वनीक्षेपक वाद्यांचा वापर करून ध्वनी प्रदूषण करुन,जिल्हाधिकारी यांचा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दोन मंडळाचे अध्यक्ष व दोन डी जे मालक अशा चौघांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

👉 कल्याण रोडवर भीषण अपघात, चिमुकलीचा मृत्यू; तीन जखमी 

म. फुले जयंती निमित्त निघालेल्या महात्मा फुले जयंती उत्सव समिती, रणांगण युवा प्रतिष्ठान या दोन मंडळांच्या अध्यक्षांना व डीजे मालक-चालक महेंद्र भाऊजी जोगदंड राहणार दत्तवाडी पुणे प्रथमेश दत्तात्रय सलगर राहणार पिंपरी चिंचवड पुणे यांना कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपक आवाजासंबंधी ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे अटी व शर्तीवरून मिरवणूक काढण्याकरिता धनुष्यपक परवानगीसह सीआरपीसी कलम 149 प्रमाणे नोटीस बजावली होती. 

👉 सावेडी उपनगराचा विकास करू : किरण काळे 

परंतु मिरवणुकी दरम्यान दोन्ही मंडळाने ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा मोठा आवाज करून ध्वनी प्रदूषण केले असे निदर्शनास आल्याने कचोरी पोलीस पथकाने दोन्ही प्रदक्षिण मापक यंत्राने डेसिबल घेतल्या असता धुनी मंडळाचे डिसेबल क्षमतेपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी मिरवणूक संपताच डीजे तात्काळ ताब्यात घेतले.

👉 परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांचे व्याज माफ : रावसाहेब वर्पे

Post a Comment

Previous Post Next Post