सहाय्यक फौजदार रविंद्र सुपेकर यांना पोलीस महासंचालक पदक


। अहमदनगर । दि.29 एप्रिल 2024 । पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या राज्यातील 800 पोलिस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक देऊन महाराष्ट्र दिनी गौरविण्यात येणार आहे यात नगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणार्‍या दहा पोलीस अंमलधारांचा समावेश असून पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार रवींद्र गंगाधर सुपेकर यांचा यामध्ये समावेश आहे.

सहाय्यक फौजदार रवींद्र सुपेकर हे 1993 साली पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले. त्यांनी कोतवाणी पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगर नियंत्रण कक्ष व पोलीस मुख्यालय येथे माने इतवारे आपले कर्तव्य पार पाडले. 

त्यांच्या या कार्याची दखल घेत यापूर्वीही त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या कार्याची दखल घेत पोलीस महासंचालक पदक महाराष्ट्र दिनी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर देऊन गौरवण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post