गवत जाळण्याच्या कारणावरून लाकडी काठीने एकास मारहाण


। अहमदनगर । दि.11 एप्रिल 2024 । शेतात गवत जाळण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकास शिवीगाळ करून लाकडी काठीने बेदम मारहाण झाल्याची घटना नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे घडली.

याबाबतची माहिती अशी की संतोष सिताराम जाधव (वय 46 राहणार निमगाव वाघा तालुका नगर) हे त्यांच्या शेतात पाणी देत असताना त्यांच्या शेजारी असणारे भाऊसाहेब अंबादास जाधव हे म्हणाले की तू तुझे गवत जायचे नाही. हे माझे शेत आहे. 

त्यावर संतोष जाधव म्हणाले की हे माझे शेत आहे मी तुझ्या शेतात गवत जाळत नाही असे म्हणल्याचा भाऊसाहेब जाधव यास राग आल्याने त्याने संतोष यास शिवीगाळ करून बाजूला पडलेल्या लाकडी काठीने डोक्यात बेदम मारहाण केली व परत माझ्या शेतात आला तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली व तिथून निघून गेला जखमी संतोष यास त्याच्या नातेवाईकांनी औषध उपचार करता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी संतोष जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब जाधव यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 324 323 504 506 अन्वये गुन्ह्याची  नोंद केली पुढील कारवाई नगर तालुका पोलीस हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post