श्रीराम कृषी सेवा केंद्रातील कोट्यावधीचा खते, औषधे जळून खाक


। अहमदनगर  । दि.28 मार्च 2024 ।
श्रीगोंदा शहरातील श्रीगोंदा दौंड रोडवरील श्रीराम एग्रो कृषी सेवा केंद्रात मध्यरात्री अचानक विजेचे शॉर्ट सर्किट होऊन कोट्यवधी रुपयांचे शेती उपयोगी खते, औषधे यासह बी-बियाणे जळून खाक झाली आहेत याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शेडगाव येथील नवनाथ रसाळ यांनी कृषी पदवी घेतल्यावर त्यांनी शेतकऱ्यांना आपल्या पदवीचा उपयोग व्हावा यासाठी श्रीगोंदयात श्रीराम ऍग्रो सर्व्हिसेस या नावाचे कृषी खते व औषधाचे दुकान सुरू केले.

मात्र दि २७ रोजी सकाळी ९ चे सुमारास दुकानातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येताना दिसल्याबाबत फोन आल्यावर सर्वजण दुकानाकडे धावून श्रीगोंदा नगरपरिषदेच्या अग्निशमन तसेच खाजगी पाणी टँकर याना संपर्क साधून आग विजविण्याचा प्रयत्न केला काही वेळाने आग आटोक्यात आली मात्र त्यावेळी कोट्यवधी रुपयांची खते बी- बियाणे औषधे जळून खाक झाली होती.

Post a Comment

Previous Post Next Post