बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी साकारली आगळा वेगळी ‘श्री’ ची मुर्ती

विविध प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून गणपती बाप्पा साकारले

। अहमदनगर । दि.12 सप्टेंबर । पारंपारिक बियाणे संवर्धनातून अकोले तालुक्याला देशात अन् विदेशात ओळख निर्माण करुन देणार्‍या अन्  पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी श्रीची आगळी वेगळी मुर्ती साकारल्याने जिल्हयात त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.


पोपेरे यांनी जीवापाड जपलेल्या बीज बँकेत विविध प्रकारच्या गावरान बियांचा समावेश करुन श्रींची मृर्ती साकारली आहे. बियाणे हेच आपले आयुष्य म्हणून शेतकरी वर्गासाठी दिवसरात्र कष्ट घेणार्‍या बीजमाता म्हणून नावलौकिक राहीबाई व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी अतिशय कष्टाने आणि कल्पकतेने हे गणपती बाप्पा साकारले आहेत.

विविध रंगछटा आणि आकार असलेल्या बियांचा अतिशय सुबकतेने त्यांनी वापर केलेला आहे. तृणधान्य गळीतधान्य तेलबिया भाजीपाल्याची विविध बियाणे यांचा त्यांनी वापर केलेला आहे. या कामात त्यांचे नातवंड, मुले आणि सुना यांनी त्यांना मदत केली.

बाप्पांची जागासुद्धा बियाणे बँकेतच निवडण्यात आलेले आहे. देश आणि विदेशात मिळालेले पुरस्कार व सन्मान चिन्ह यांचा कल्पकतेने वापर करून सुंदर आरास बाप्पा भोवती तयार करण्यात आली आहे. राहीबाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येत अनेक अडचणींवर मात करून पारंपारिक बियाणे जतन करून ठेवलेली आहेत.

हीच बियाण्यांची बॅेकंची महिमा आता सातासमुद्रापार गेलेली आहे. या राहिबाईंचा आदर्श आता जिल्ह्यासह राज्यभर घेतला जात असून अनेकांनी बियाण्यांची बँक सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केलेले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post