। अहमदनगर । दि.30 सप्टेंबर । येथील राहाता बाजार समितीत कांद्याच्या सुमारे साडे तीन हजार कांदा गोण्यांची आज (गुरुवारी) आवक झाली. एक नंबर कांद्याला सर्वाधिक 2600 चा भाव मिळाला आहे. शेतकर्यांना यामधून दिलासा मिळाला आहे.
राहाता बाजार समितीत कांद्याच्या तीन हजार 632 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला आज फक्त 2600 रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला. एक नंबर कांद्याच्या प्रतवारीच्या भावात वाढ झाली.
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव : एक नंबर कांदा : 2200 ते 2600, दोन नंबर कांदा : 1450 ते 2150, तीन नंबर कांदा : 700 ते 1400, गोल्टी कांदा : 1600 ते 1900, जोड कांदा : 200 ते 700. शेतकर्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या संचालक मंडळासह सचिवांनी केले आहे.
कांद्याच्या भावात वाढ होऊ लागल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावण निर्माण झाले आहे. एकीकडे दुहेरी संकट असताना कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे.
Tags:
Ahmednagar
