जिल्ह्यात १२४ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

आतापर्यंत ७० हजार ४३६ रुग्ण 

बरे होऊन परतले घरी

 
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ टक्के

आज ७९ रूग्णांना डिस्चार्ज तर 

१२४ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

 

। अहमदनगर । दि.03 फेब्रुवारी । जिल्ह्यात आज ७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ४३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०९ टक्के इतके झाले आहे. 

 

दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १००४ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८८ आणि अँटीजेन चाचणीत १९ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, जामखेड ०१, कर्जत ०४, नगर ग्रामीण ०३, पारनेर ०१ आणि श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, अकोले ०३, जामखेड ०१, कर्जत ०१, कोपरगाव २०, नगर ग्रामीण ११, नेवासा ०१, पारनेर ०२, राहाता ०५, राहुरी ०३, संगमनेर २४, शेवगाव ०१, श्रीरामपूर ०३ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन  चाचणीत  आज १९ जण बाधित आढळुन आले. मनपा ०६, कोपरगाव ०१,  नगर ग्रामीण ०२, नेवासा ०२, पारनेर ०६ आणि राहता ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २३, कोपर गाव ०३, नगर ग्रामीण १२, नेवासा ०१, पारनेर ०३, पाथर्डी ०४, राहाता ०१,  राहुरी ०१, संगमनेर १४, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०४, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या : ७०४३६

*उपचार सुरू असलेले रूग्ण : १००४

*मृत्यू : ११०६

*एकूण रूग्ण संख्या : ७२५४६


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

दिनांक ३ फेब्रुवारी, २०२१, सायं.६ वा

 

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा


खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

माझे कुटुंब माझी जबाबदारी 
 
 

Post a Comment

Previous Post Next Post