जिल्हा महिला बचत गटाकडून विशेष गौरव

निसार मास्टर यांचे व्यसनमुक्ती कार्य 

हे दिपस्तंभासारखे प्रेरणा देणारे : आशा तुंगार

। अहमदनगर । दि.14 जानेवारी । गेल्या अनेक वर्षापासुन व्यसनमुक्तीची चळवळ उभी करणारे सक्रीय सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार निसार मास्टर यांचे व्यक्तिमत्व हे एखाद्या दिपस्तंभासारखे प्रेरणा देणारे आहे. आजच्या नकारात्मक समाज जीवनामध्ये त्यांनी केलेले काम हे मुलभुत स्वरुपाचे आहे. व्यसनमुक्ती सारख्या अवघड क्षेत्रात काम करणे म्हणजे प्रवाहा विरुध्द पोहणे होय. त्यांना पद्श्री मिळावे इतके त्यांचे कार्य महान आहे. जिल्हयासाठी गौरवास्पद आहे, असे उद्गार श्रुतीका महिला गटाच्या अध्यक्षा आशा तुंगार यांनी काढले.

अहमदनगर जिल्हयातील विविध महिला बचत गट तसेच संस्थांच्या महिला प्रतिनिधींच्यावतीने निसार मास्टर यांचा सन्मान करण्यात आला. सहकार सभागृह रोड येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी  श्रुतीका महिला गटाच्या अध्यक्षा आशा तुंगार, ज्योती गुस्सा (जयशंकर महिला बचत गट), आशा पांडुळे (जिजाऊ बचत गट), मंगला शिंदे (यशप्राप्ती बचत गट), शोभा मराठे, स्वाती दहातोंडे, अरुणा साळवे, ललिता जाधव, शितल दळवी (राधाकृष्ण बचत गट), रेखा अमृत (अन्नापुर्णा बचत गट), दिपाली तुंगार (माऊली बचत गट) आदींच्या पदाधिकारींची विशेष उपस्थिती होती.

सत्काराला शेख निसार मास्टर यांनी पुढील शब्दात कृतज्ञता व्यक्त करतांना म्हणाले, ‘‘समाज जीवनात सध्या मानसिक आरोग्याच्या गंभीर प्रश्‍न निर्माण होत आहे. कोणत्याही व्यसनाचे मुळ व्यक्तीच्या मानसिक आरोग्याचे मुळ कारण असते. नैराश्याच्या आहारी जाऊन लोक व्यसनी होतात व आपले बहुमुल्य जीवन मातीमोल करतात. 

या गोष्टीचा मला अस्वस्थ करणारा अनुभव अनेक वेळेस आला. कोणतेही अपयश आणि वैफल्याला व्यसन हा पर्याय असु शकत नाही. जुन्या सवयी बदलणे व चांगल्या नव्या सोयी अंगीकारणे हेच व्यसनमुक्तीचे खरे रहस्य होय. महिला भगीनीनी जिल्हयाच्या वतीने केलेला सत्कार माझ्या जीवनात नैतीक बळ देणारा आहे व माझे काम हे पुण्याचे काम असुन त्या भावनेला बळकटी देणारे आहे.

शेख निसार मास्टर यांना यापुर्वी अनेक सन्मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी अनेक तरुणांना 100% अंमली पदार्थ व मद्यपानाच्या व्यसनातुन मुक्त केले आहे. तसेच त्यांनी सिव्हील हॉस्पीटल, जिल्हा परिषद, डी.एड्.कॉलेज,  हातमपुरा येथे व्यसनमुक्तीसाठी अनेक शिबीरे आयोजित केलेली आहेत. झोपडीपट्टी प्रभागात देखील शिबीराव्दारे प्रबोधनाचे महान कार्य केले आहे.

या कार्यक्रमास विविध महिला बचत गटाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा पांडूळे यांनी केले तर आभार मंगल शिंदे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post