। मुंबई । दि.14 जानेवारी । अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच बदली करण्यात आलेले मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्यासह आज चार अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
धडाकेबाज कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे सर्वपरिचित आहेत. त्यांचे धाडसी निर्णय आणि कार्यशैलीमुळे ते नेहमीच वादग्रस्त ठरलेले आहेत.
पाच महिन्यांपूर्वीच त्यांची नागपूरच्या पालिका आयुक्तपदावरून थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.
पण पाच महिनेही पूर्ण होत नाहीत तोच पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे. आता त्यांची राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
