। अहमदनगर । दि.14 जानेवारी । श्रीरामपूर शहरातील वाॅर्ड क्र. १ मधील बोरावके कॉलेजच्या पाठीमागे यादवनगर भागात राहणाऱ्या सुमन रमेश यादव या घरालगत असलेल्या किराणा दुकानात एकट्या बसल्या असताना त्यांच्या गळ्यातील ५० हजारांचे सोन्याचे गंठण भामट्यांनी हिसका मारून लांबवले.
ही घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी काळी विनानंबरची पल्सर वापरली. सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याआधीच पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
