सावित्रीबाई फुले जयंतीचा उपक्रम : सावित्रीच्या लेकींसाठी रोशनी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

टाटा पॉवर कॅम्युनिटी डेव्हलपमेंट 

ट्रस्ट आणि बॉस्को  ग्रामिण विकास केंद्राच्या 

संयुक्त विद्यमाने उपक्रम

। अहमदनगर । दि.03 जानेवारी ।  सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून टाटा पॉवर कॅम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बॉस्को ग्रामिण विकास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव कौंडा (ता. नगर) येथे महिलांसाठी रोशनी प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा कोटक बँकेच्या (मुंबई) सीएसआर माया पाटील, मराठवाडा ग्रामीण विकास केंद्राच्या श्रद्धा चव्हाण, टाटा पॉवर कॅम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टचे सीएसआर विश्‍वास सोनावले, बॉस्को ग्रामिण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज डिअ‍ॅब्रिओ, सरपंच सतीश ढवळे, उपसरपंच छायाताई ढवळे आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

प्रास्ताविकात फादर जॉर्ज डिअ‍ॅब्रिओ म्हणाले की, महिला सक्षमीकरणाच्या उद्दीष्टाने व त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी रोशनी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महिलांना ब्युटीपार्लर, शिवणकाम, मसाला बनविणे, रजई बनविणे आदि घरगुती पध्दतीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post