। अहमदनगर । दि.14 जानेवारी । मकर संक्रांत हा जीवनात गोडवा निर्माण करणारा सण आहे. मनाला आनंद देणारा हा सण रोटरी क्लबने हा सण सावली प्रकल्पात साजरा करत आनंद द्विगुणित केला आहे. सावली मधून मुलांना चांगले संस्कार मिळत असल्याने उद्याची देशची धुरा सांभाळण्याचे सामर्थ्य तुम्हाला मिळत आहे. रोटरी क्लबचे सामाजिक जाणीवेतून सण साजरा करण्याचा उपक्रम वाखाण्याजोगा आहे. आपला भारत जगात सर्वशक्तिमान होण्यासाठी सण साजरा करतांना जास्तीतजास्त भारतीय बनावटीच्या वस्तूंचा वापर करावा, असे प्रतिपादन वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक विकास देवरे यांनी केले.
नगरच्या रोटरी मेन क्लबच्या वतीने मकर संक्रांती निमित्त केडगाव येथील सावली प्रकल्पातील विद्यार्थ्यांना पोलीस निरिक्षक विकास देवरे यांच्या हस्ते तिळगुळ वाटप करून भरपूर पतंग देवून मकर संक्रांतिचा सण साजरा केला. यावेळी क्लबचे अध्यक्ष अॅड. अमित बोरकर, सचिव पुरुषोत्तम जाधव, प्रशांत बोगावत, दादासाहेब करंजुले, पराग कुलकर्णी, सावलीचे नितेश बनसोडे आदी उपस्थित होते. सर्व मुलांच्या चेहऱ्यावर भरपूर पंतग मिळाल्याचा आनंद यावेळी दिसत होता.
प्रास्ताविकात अॅड. अमित बोरकर म्हणाले, नगरचा रोटरी क्लब प्रत्तेक सण सामाजिक उपक्रमांनी साजरा करतांना समाजातील वंचित घटकांना आनंद देण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा करोनाची सर्वाजास्त रुग्ण होत होती त्यावेळी रोटरी कोविड सेंटरच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मोफत उपचार, निवास व भोजनाची व्यवस्था केली होती. मकर संक्रांत साजरी करतांना सावली मधील मुलांना भरपूर पतंग दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदातच आमचा आनंद आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव पुरुषोत्तम जाधव यांनी केले. सुत्रसंचलन दादासाहेब करंजुले यांनी केले.
