नगर तालुक्यात निवडणूक साहित्य वाटप
। अहमदनगर । दि.14 जानेवारी । जिल्हयातील 705 ग्रामपंचायतींच्या 1 हजार 326 जागांसाठी 5 हजार 716 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी शुक्रवार दि.15 रोजी मतदान होत आहे.
या निवणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नगर तालुक्यातील मतदान केंद्रावर साहित्य वाटप पाऊलबुद्धे विद्यालय येथून करण्यात आले.
यावेळी तहसीलदार उमेश पाटील यांच्या उपस्थितीत साहित्य चेक करण्यात आले. तसेच वाटप करण्यात आले. यावेळी कर्मचारी आणि साहित्य घेऊन आपआपल्या मतदान केंद्रावर निघाले.
मतदानप्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दीड हजार कर्मचारी तैनात केली आहेत. प्रत्येक केंद्रावर 5 कर्मचारी असणार आहेत. सर्व मतदान केंद्रावर कोरोना प्रतिबंध उपाय योजना करण्यात येणार आहे.
जिल्हयात 767 पैकी फक्त 53 ग्रामपंचायतीच बिनविरोध झाल्या आहेत. इतर ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान होत आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
या निवडणूकीसाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजपर्यंत राहणार आहे. शुक्रवारी होणार्या मतदानासाठी गुरुवारीच केंद्र सॅनिटाईज करण्यात आले आहे.
सामाजिक अंतर राखून मतदान करता यावे यासाठी एका केंद्रावर सहाशे ते सातशे मतदारांना मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
