। अहमदनगर । दि.14 जानेवारी । प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकीसाठी ईच्छुक विद्यार्थांना प्रवेशासाठी अंतिम संधी म्हणून दि. 15 जानेवारी 2021 पर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगरचे प्राचार्य प्रा.मुकुंद सातारकर यांनी दिली.
ज्या विद्यार्थ्यांना आता पर्यंत इतरत्र कोणत्याही संस्थेत पदवीकेसाठी प्रवेश मिळालेला नाही अशा पदविकेसाठी प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांना या निमित्ताने प्रवेशास संधी निर्माण झाली आहे.
दरम्यान शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर या संस्थेमध्ये उत्पादन अभियांत्रिकी व उपकरणीकरण अभियांत्रिकी या शाखांमध्ये काही जागा रिकाम्या असल्याची माहिती प्राचार्यांनी देत प्रवेश प्रक्रीयेमध्ये प्रत्यक्ष संस्थेत येवून सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.
