अहमदनगर जिल्ह्यात आज ३७१ रुग्णांना डिस्चार्ज तर २८३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

आतापर्यंत ६२ हजार २१२ रुग्ण बरे होऊन परतले घरी

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१७ टक्के

 

नगर, (दि.05 डिसेंबर) :   अहमदनगर जिल्ह्यात आज ३७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार २१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१७ टक्के इतके झाले आहे.

 

दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २८३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५१५ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७३ आणि अँटीजेन चाचणीत १४७ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले ०७, जामखेड ०३,कर्जत ०४, कोपर गाव ०१,  नगर ग्रामीण ०१, नेवासा ०३, राहाता ०२, राहुरी ०४, संगमनेर ०६, शेवगाव ११, श्रीरामपुर ०५  अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, अकोले ०७, कर्जत ०२, कोपर गाव ०४, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०५, पारनेर ०३, पाथर्डी ०१, राहाता ०४, राहुरी ०२,  संगमनेर १२, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१ आणि श्रीरामपूर  ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज १४७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०२, अकोले ०७, जामखेड ०४, कर्जत ०२, कोपरगाव १३, नगर ग्रामीण ०१,  नेवासा ०९, पारनेर ०६, पाथर्डी १५, राहाता २७, राहुरी ०१, संगमनेर ३४, शेवगाव ०९, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ०५ आणि कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ६२, अकोले २८, जामखेड ०९, कर्जत ०५, कोपरगाव २०, नगर ग्रामीण ०८, नेवासा ३२, पारनेर ३५,पाथर्डी १७, राहाता १८, राहुरी ३०, संगमनेर ५७,  शेवगाव १०, श्रीगोंदा १६ श्रीरामपूर १८, कॅन्टोन्मेंट ०२ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०४  अशा रुग्णांचा समावेश आहे.


* बरे झालेली रुग्ण संख्या : ६२२१२

* उपचार सुरू असलेले रूग्ण : १५१५

* मृत्यू : ९६२

* एकूण रूग्ण संख्या : ६४६८९

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

दिनांक: ०५ डिसेंबर, २०२०, रात्री ७ वाजता 

Post a Comment

Previous Post Next Post