नगर, (दि.06 डिसेंबर) : नुकत्याच ऑनलाइन झालेल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या एलएलबी २०२० परीक्षेत गौरव सुनील डहाळे याने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले. त्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशांत पाटोळे, अमित खामकर, सनी सोळंकी, मीत सोळंकी उपस्थित होते. जगताप म्हणाले, गौरव डहाळेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेतही यश मिळवण्याबरोबरच ग्रिनिज बुक, लिम्का बुक, आशिया बुक अशा विविध रेकॉर्ड बुकमध्ये विश्वविक्रम करून नगरचे नाव उंचावले आहे, हे कौतुकास्पद आहे. गौरव हा नगर येथील शगुन ज्वेलर्सचे संचालक सुनील डहाळे यांचा मुलगा आहे. या यशाबद्दल डहाळे यांचे अभिनंदन होत आहे.
Tags:
Ahmednagar
