नगर, (दि.31 ऑक्टोबर) : के जी ऑटो लिमिटेड या कंपनीचे विळद घाटातील वर्कशॉप अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी 23 हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना दि.29 रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
नगर - मनमाड रोडवरील विळदघाट जवळील वृध्दाश्रमा जवळ इंडियन पेट्रोल पंपालगत असलेल्या के जी अल्टो लि. कंपनी येथे घडली आहे. एमआयडीसी परिसरातील के जी अल्टो लि. कंपनीच्या वर्कशॉपच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात इसमाने आत प्रवेश करुन आतील सुमारे 20 हजार रुपये किंमतीचे सिंटेक्स कंपनीचे साहित्य, संगणक संच, 500 रुपये किंमतीचे टूल्स, 500 रुपये किंमतीचा पेनड्राईव्ह, असा सुमारे 23 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले आहे.
चोरट्यांनी जाताना वर्कशॉमधील अन्य सामानाचे नुकसान केले आहे. याप्रकरणी समीर जीवन मुळे (वय 28, रा.लेखानगर,सावेडी) यांनी एमआयडसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
